Home राजकीय मोदींच्या वाढदिवसानिमित्त कलम ३७० संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश

मोदींच्या वाढदिवसानिमित्त कलम ३७० संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश

0
23


modi article 370 1564995295
 

अहमदाबाद (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळा, सरकारी अनुदानित आणि विना-अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये घटनेतील कलम ३७० च्या निर्णयासंदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे.

 

१७ सप्टेंबर रोजी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असा स्पष्ट उल्लेख या परिपत्रकामध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस असतो. आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या माहितीचा अहवाल १८ सप्टेंबरपर्यंत माध्यमिक शिक्षण निर्देशकांच्या कार्यालयामध्ये पाठवण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. या परिपत्रकानुसार शाळांमध्ये कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात वादविवाद स्पर्धा, विशेष लेक्चर, निबंध लेखन स्पर्धा, ग्रुप डिस्कशन यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगण्यात आले आहे.


Protected Content

Play sound