चोपडा प्रतिनिधी । यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी नुकतेच ‘चिखलदिन’ आयोजन करण्यात आला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, आजच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांना बाहेर चिखलात खेळायला मिळत नाही. त्यामुळे चिखलापासून वेगवेगळ्या प्रकारची मातीची खेळणी बनवने, यासारखे प्रकार आता विद्यार्थींच्या जीवनातून लुप्त होतांना दिसत आहेत. म्हणून शाळेत विद्यार्थ्यांसाठी चिखलदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी चिखलात खेळण्याचा आनंद घेण्यासोबतच चिखलापासून हातापायांच्या ठस्सांच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या बनवल्या. मतिपासून खेळणी व वस्तू बनविण्याच्या प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटिल तर डॉ. तृप्ती पाटील, प्राचार्या मिस प्रमेश्वरी मॅडम यांच्यासोबत इतर शिक्षकवृंद आणि कर्मचारी उपस्थितीत होते.