यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देश वासियांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रसिद्ध श्री व्यासमुनींच्या नुतनीकरणासाठी शासनाच्या वतीने निधी प्राप्त झाला असुन,मंदीराच्या कामास सुरूवात झाली आहे. काम करत असतांना मंदीराच्या जुन्या गाभाऱ्यास पाडण्यास शिवसेना शिंदे गटाने विरोध केला असून हे काम तातडीने थांबविण्यात यावे असे निवेदन यावल तहसीलदारांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल शहरात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तपस्वी श्री व्यासमुनींचे प्रसिद्ध मंदीर आहे. या मंदीराच्या नुतनीकरणाच्या कामासाठी शासनाकडून ४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदरच्या मंदीरच्या नुतनीकरणाच्या कामास सुरूवात करण्यात आली. दिराच्या नुतनीकरणाचे काम करण्यासाठी ज्या ठीकाणी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तपस्वी ऋषिमुनी श्री व्यास यांनी मुळ ज्यास्थळी जप तप करून मंदीराची स्थापना केली आहे. दरम्यान सदरच्या मंदिराचे नुतनीकरण व्हावे, अशी सर्वांची ईच्छा आहे परंतु सदरचे नुतनीकरण करण्यासाठी शेकडो वर्ष जुने मंदीर पाडण्यास शिवसेना ( शिंदे ) गटाने आपला विरोध दर्शविला आहे.
सदरच्या मुळ मंदीरास पाडल्यास लाखो भावी भक्तांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता लक्षात घेवुन जुन्या मंदिराची मुळ जागा न पाडता मंदिराचे नुतनीकरण व्हावे अशी मागणी शिवसेना ( शिंदे) गटाचे शहराध्यक्ष पंकज बारी, सागर सपकाळे ,राजु सपकाळे,राजु बारी आदींनी निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे .