चाळीसगाव, प्रतिनिधी | गेल्या ५० वर्षांपासून तालुक्यातील एक प्रमुख नदी असलेल्या तितुर नदीवर सिमेंट बंधारे व्हावेत, अशी जनतेची मागणी होती. आघाडी शासनाचा काळात या मुद्द्यावर तालुकवासीयांना फक्त झुलवले गेले मात्र त्यांची सत्ता असताना पाच वर्षात राष्ट्रवादीचे माजी आमदार या बंधाऱ्यांची साधी टेंडर प्रोसेससुद्धा करू शकले नाहीत. असा आरोप महायुतीतर्फे आज (दि१५) करण्यात आला.
भाजपा सरकारच्या नदी पुनरुज्जीवन योजनेतून तितुर नदीवर चार कोटी रुपयांचे आठ बंधारे बांधण्यात आले. त्यामुळेच ओझर ते हिंगोणे पर्यंतचा परिसर आज सुजलाम सुफलाम झालेला दिसतो. पाच वर्षात त्यांनी किती सिमेंट बंधारे तालुक्यात उभारले ? याचा हिशोब जनतेला द्यावा, असे आव्हानही महायुतीतर्फे देण्यात आले आहे.