पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील नद्यांमधून उघडपणे वाळू उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे याकडे महसूल अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्यामुळे वाळू माफियांचे ‘अच्छे दिन’ सुरु असल्याचे चित्र आहे.
माहेजी येथिल वाळू ठेका सुरू असताना ठराविक वाळू माफियांनी काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन रात्र दिवस वाळू चोरी करून बिनधास्त उपसा करीत आहे. याकडे प्रशासन मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे. तर दुसरीकडे उपजिल्हाधिकारी राजेंद्र कंचरे हे वाळू माफियांना कायमस्वरूपी लगाम लावण्यासाठी रात्र दिवस प्रशासकीय ताफा घेऊन वाळू चोरी करणाऱ्यां वाहनांवर कारवाई करीत आहे. प्रांताधिकारी यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल समाधान व्यक्त होत आहे. परंतू तहसिल कार्यालयातील काही अधिकारी,कर्मचारी यांचे वाळू माफियां सोबत धागेदोरे तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तहसीलदार यांनी वाळू वाहतुकीची तपासणी करून कारवाई करावी, अशी अपेक्षा होत आहे. अन्यथा जिल्हाधिकारी यांनी स्व:ता पाचोरा महसूल विभागाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पाचोरा तालुक्यातील घरगुती गॅसच्या हंडीचा देखील मोठ्या प्रमाणात उघडपणे काळाबाजार होतोय.वाहन व हॉटेलच्या लहानमोठ्या व्यवसायसाठी खुलेआम घरगुती गॅसचा वापर केला जातोय.