जळगाव, प्रतिनिधी | राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यपाल म्हणून नव्हे तर संघाचा एक स्वयंसेवक म्हणून काम केल्याचा आरोप कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी केला. राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महा विकासआघाडीची सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याने आज कॉंग्रेस भवनात जल्लोष करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
रवींद्रभैय्या पाटील यांनी पुढे सांगितले की, राज्यपाल हा निष्पक्ष , कायद्याचे पालन करणारा असावा. पण कायदा धाब्यावर बसवून एका रात्रीतून गुपचूप लपूनछपून हा सगळा शपथविधी झाल्याने महाराष्ट्राची जनता प्रचंड नाराज होती. हे सरकार लवकर जावा ही जनतेची अपेक्षा होती. आज सुप्रीम कोर्टाने मोठा ऐतिहासिक निर्णय देऊन होणारा बेकायदेशीरपणा खोडून काढला आहे. या निर्णयाने नरेंद मोदी व अमित शाह यांना एक मोठी चपराक दिली आहे. आज सर्वशी आनंदाचा दिवस असून महाआघाडीचे सरकार दोन तीन दिवसात स्थापन होईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, शहर सरचिटणीस दीपक सोनवणे, युवक कॉंग्रेसचे बाबा देशमुख, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष मुजीद पटेल, कपिल शेख अहमद, राहुल मोरे, जगदीश गाढे, प्रदीप सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पहा काय म्हणाले जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1284132908445313/