मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अग्नीपथच्या माध्यमातून भाडोत्री सैन्याची तयारी सुरू असेल तर मग आगामी काळात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या पदांसाठीही टेंडर काढावे लागेल अशा शब्दांमध्ये उध्दव ठाकरे यांनी केंद्राच्या निर्णयावर हल्लाबोल केला.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज पवई येथील हॉटेल वेस्ट इन मध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडल उद्याच्या निवडणुकीत मविआ विजय संपादन करणार असल्याचा सांगितले. ते म्हणाले की एकही शिवसैनिक हा गद्दार नसून मविआ देखील एकसंघ आहे. यामुळे राज्यसभेत जसा पराभव झाला तर विधानपरिषदेत होणार नसून उद्या आम्हीच जिंकणार आहोत.
याप्रसंगी ठाकरे यांनी अग्नीपथ योजनेवरून केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे ? सैन्यच जर भाडोत्री असेल तर मग राजकारण्यांसाठी निवडणूक काहीही गरजेचे नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार या पदांसाठी देखील टेंडर प्रक्रिया राबवा अशी खिल्ली उडवत त्यांनी या निर्णयावर टीका केली. हृदयात राम आणि हाताला काम हेच आमचे हिंदुत्व असल्याचेही त्यांनी याप्रसंगी नमूद केले.