जळगाव प्रतिनिधी । शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील दुकानांना उघडण्याची पूर्ण परवानगी मिळाली नसून ते फक्त चार तास होम डिलीव्हरी करू शकतात असा निर्णय आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेण्यात आला.
शहरातल्या व्यापारी संकुलांमधील दुकाने बंद असल्याने व्यापारी नाराज आहेत. व्यापार्यांसह काम करणारे आणि त्यांच्या कुटुंबियांवर यामुळे आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह व्यापार्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यात व्यापारी संकुलांमधील दुकाने पूर्ण उघडणार नसून दुकानदार चार तासापर्यंत होम डिलीव्हरीसाठी आपले दुकान उघडू शकणार असल्याचा निर्णय झाला. तर शहरातील अन्य दुकाने हे ऑड-इव्हन या फॉर्म्युल्यानुसार सुरू राहणार आहेत. तसेच पत्रे लाऊन रस्ते बंद केल्यामुळे होणारी कोंडी सुटावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती देखील याप्रसंगी देण्यात आली.
खालील व्हिडीओत पहा व्यापार्यांच्या प्रतिनिधींनी याबाबत दिलेली माहिती.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/715415452362250/?eid=ARA3LeyJZ1dDmSeY5-TZx-Dlb06CRuTR_Ny645szMI7LTxvst1TRU9GM4Okm4d4Z3EkGYcDpA4h2_mNd