जळगाव प्रतिनिधी । शहरातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखेच्या वतीने आज रविवारी प्रभावी बायोडाटा व मुलाखतीची तयारीसाठी ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते प्रा.डॉ.राहुल कुलकर्णी यांचे अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. यावेळी सरांनी विद्यार्थ्यांना बायोडाटा व इंटरव्यू तयारी कशा पद्धतीने करावी याच्या काही टिप्स दिल्या. त्याच प्रकारे कोरोणाच्या काळात आधुनिक प्रकारे ऑनलाईन मुलाखती कशाप्रकारे घेतली जाते, याचे देखील त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. यावेळी कार्यक्रमाला प्रा.डॉ.राहुल कुलकर्णी,अभाविपचे जळगाव महानगर मंत्री आदेश पाटील, सोशल मीडिया प्रमुख ऋत्विक माहुरकर, जितेश चौधरी, संकेत सोनवणे व मोठ्या संख्येने ऑनलाइन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
अभाविपतर्फे प्रभावी बायोडाटा तयारीसाठी ऑनलाईन कार्यशाळा
4 years ago
No Comments