चाळीसगाव, प्रतिनिधी । जागतिक पर्यावरण दिवस हा ५ जून रोजी असल्याने या पार्श्वभूमीवर तालुक्यात पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी पर्यावरण सखी मंचची आँनलाईन झुम मिटींगचे नुकतीच आयोजन करण्यात आले होते.
मानव हा स्वतःच्या फायद्यासाठी जिवंत झाडांची कत्तल करू लागल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. याचा फटका हा संपूर्ण सजीव सृष्टीला बसत आहे. येत्या ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस असल्याने चाळीसगावात पर्यावरण “सखी मंचची ऑनलाईन’ झुम मिटींगद्वारे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने हि ऑनलाईन मिटींग घेण्यात आली होती. यावेळी एकमेकांचे परिचय देण्यात आले. सहकोषाध्यक्ष माया सावंत यांनी संस्थापक अध्यक्ष आबासाहेब मोरे यांचा परिचय, तज्ञ मार्गदर्शक नेहा भोसले यांनी संकल्पना व मंडळाचे समन्वयक नानासाहेब पाटील यांचा परिचय, कार्याध्यक्ष:सौ .शोभा अग्रवाल यांनी जिल्हा अध्यक्षा नयना पाटील यांचा परिचय, जिल्हा उपाध्यक्ष प्रिया देशमुख यांनी जिल्हा कार्याध्यक्षा मनिषा पाटील यांचा परिचय दिला.
यावेळी वृक्षप्रेमी आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला एक नवीन दिशा मिळाली व कार्यक्रमाला योग्यरीत्या सुरूवात करण्यात आली. नानासाहेब पाटील यांनी कार्यक्रमाची दिशा कशी असावी याविषयी मार्गदर्शन करून जिल्हा अध्यक्षा नयना पाटील यांनी महिलांना वृक्ष वृक्षलागवड व संगोपन कसे करावे. तसेच प्रत्येकाने किमान पाच रोपे तयार करण्याचे आवाहन केले. जिल्हा कार्याध्यक्ष मनिषा पाटील यांनी उपस्थितांना एक जुटीने वृक्षलागवड व संगोपन विषयक कार्य करण्याचे संबोधित केले. तसेच जिल्हा उपाध्यक्ष प्रिया देशमुख यांनी पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धना विषयी जागृती निर्माण करणे व प्रत्येकाने पर्यावरण बाबत पुढाकार घेणे आदी घटकांवर भर देण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रस्तावीक शहराध्यक्ष रंजना पाटील यांनी केले. यावेळी शहर उपाध्यक्षा प्रतिभा पाटील, सचिव रत्नमाला मराठे, सहसचिव, वैशाली सुर्यवंशी, अश्विनी चिंचोले, विशाखा दायमा, कोषाध्यक्ष ज्योती देशमुख, संघटक सुनिता पाटील, सहसंघटक मनिषा शिनकर आदींनी सहभाग नोंदवला.