जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षक आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे कारगील विजय दिवस निमित्त नॅशनल डिफेन्स ऍकेडेमी, पुणे येथील सेवानिवृत्त प्रा.डॉ.नंदकिशोर कुमार यांचे सोमवार २६ रोजी ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले.
‘द कारगील कॉन्फ्लिक्ट: अ लेसन’ या विषयावर बोलतांना प्रा.डॉ.नंदकिशोर कुमार यांनी १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांनी कारगील, द्रास बटालिक व तोलेलींग या भारताच्या सामरिक दृष्टीकोनातून महत्वपुर्ण भागावर अतिक्रम केल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय मोहिमेद्वारे दहशवाद्यांना या भागातून कश्या प्रकारे हुसकावून लावले हे सांगताना या मोहिमेत ५२७ जवान शहिद व १३०० सैनिक जखमी झाल्याची माहिती दिली. या युध्दात डॉ. नंदकिशोर कुमार यांचे नॅशनल डिफेन्स ऍकेडेमीचे विद्यार्थी कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन विजयन थापर हे शहिद झाल्याचे व त्यांनी केलेल्या अतुल्य शौर्याची माहिती दिली. या कार्यक्रमात ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ.सुभान जाधव यांनी केली. समारोपीय मनोगत प्रा.विलास कुमावत यांनी व्यक्त केले. कला व मानव्य विद्या प्रशाळेचे संचालक डॉ.अनील चिकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ.तुषार रायसिंग, सचिन चव्हाण यांनी परिश्रम घेतले.