यावल प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावलच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे कोरोना काळातील आरोग्याचे रक्षण या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता.
दि. ३ जुलै २०२१ वेळ दुपारी ४ वाजता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषविले तर प्रमुख मार्गदर्शक डॉ. कुंदन फेगडे (स्त्रीरोग तज्ञ, यावल ) यांनी केले.
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू भगिनी यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित कार्यक्रम ZOOM Cloud Meeting App वर घेण्यात आले सर्वांनी त्याचे लाभ घेतले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी ZOOM LINK वर उपस्थित राहीलेत व या कोरोनापासुन रक्षणासाठीच्या मार्गदर्शन व्याखनात आपला सहभाग घेतला.
सदर कार्यक्रम सुरू असताना सर्वांनी आपल्या मोबाईलचे माईक बंद करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ .पी .व्ही . पावरा यांच्या वतीने आवाहन करण्यात आले होते त्यांच्या या आवाहान उत्तम प्रतिसाद मिळाला . दरम्यान सुमारे दिड तास चाललेल्या या ऑनलाईन कोरोना पासुन रक्षण या व्याखनात४० प्राध्यापक , विद्यार्थी , विद्यार्थीनी यात आपला सहभाग नोंदविला यावेळी डॉ . कुंदन फेगडे यांनी कोरोना विषाणु संसर्गाचा चिन या परदेशातुन झालेला उगम त्याचे मानवी जिवनावर झालेले दुष्परिणाम ,कोरोना आपणास झाल्यास ते कसे ओळखावे त्यावर उपाचाराची पद्धती कशी असावी, कोरोना पासुन बचावसाठी कोणकोणत्या नियमांचे पालन करावे आणी कोवीडशिल्डची लस घेणे किती आवश्यक आहे या विषयावर त्यांनी व्याखनातुन अभ्यासपुर्वक मार्गदर्शन केलीत. यावेळी त्यांनी या व्याखनात मार्गदर्शनासाठी आपले बहुमोल वेळ दिल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . संध्या सोनवणे यांनी डॉ . कुंदन फेगडे त्यांचे आभार मानले.