अखिल भारतीय लेवा महाविकास विद्यार्थी संघटनेतर्फे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

 

सावदा प्रतिनिधी । अखिल भारतीय लेवा महाविकास विद्यार्थी संघटना तर्फे सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी  वक्तृत्व विकासासाठी  भव्य वक्तृत्व स्पर्धाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे.

वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट वक्ता सादर करण्याकरिता जळगाव जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व युवकांसाठी घरबसल्या ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम गट  तिसरी ते सहावी  वेळ ४ मिनिटे , द्वितीय गट सातवी ते दहावी वेळ ५ मिनिटे, तृतीय गट अकरावी ते पदवीधर वेळ ६ मिनिटे असे असून त्या स्पर्धेच्या नियम व अटी आपल्या वक्तृत्वाचा व्हिडिओ दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर दि. २६ एप्रिल २०२१ पर्यंत पाठवावे. वक्तृत्वाचा व्हिडिओ दिलेल्या गट, वेळ व विषय  यानुसार असावा. वक्तृत्वाचा व्हिडिओ मराठी भाषेतच असावा. व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवताना संपूर्ण नाव, पत्ता, वर्ग व संपर्क क्रमांक पाठवणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. वक्तृत्वाचा व्हिडिओ शूटिंग करतांना कमीत कमी एमबीचा होईल याची काळजी घ्यावी. जेणेकरून व्हिडिओ पाठवताना अडचण येणार नाही. व्हिडिओमध्ये  कोणत्याही प्रकारची एडिटींग नसावी,  परीक्षकांनी  घेतलेला निर्णय अंतिम राहील. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना बक्षीसासाठी कळविण्यात येईल आणि उर्वरित सहभागींना व्हॉट्सअपद्वारे सहभाग प्रमाणपत्र पाठवण्यात येईल. व्हिडिओ अपलोड झाले की, दि. २६ एप्रिल पासुन ते ५ मे पर्यंत लाईक्स आणि कमेंट्स चे परीक्षण केले जाईल. 

लाईक्स आणि कमेंट्सला ५० मार्क्स 

लाईक्स आणि कमेंट्सला ५० मार्क्स आणि परिक्षणाला ५० मार्क्‍स राहतील. १२ मे रोजी सकाळी ११ वाजता  विजेत्याचे नाव घोषित केले जातील अधिक माहितीसाठी  जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सागर सरोदे ,  उपजिल्हाध्यक्ष हर्षल  चौधरी ,  महिला तालुकाअध्यक्ष सायली महाजन, यावल तालुका सचिव  खुशबू पाटील,   सोशल मीडिया प्रमुख  मोहित धांडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

Protected Content