जळगाव, प्रतिनिधी । युजीसीने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णया घेतला आहे या निर्णयाविरोधात फार्मसी कृती समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने १३ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी घरातूनच केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, विद्यार्थ्यानी हातात मेणबत्ती पकडुन व तोंडावर काळ्या रंगाची पट्टी बांधून निषेध व्यक्त केला. व UGC आणि केंद्र सरकारला मेल करून विरोध व्यक्त केला. युजीसी ने घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणारा निर्णय असून हा निर्णय तात्काळ बदलून विद्यार्थी हिताचा व त्यांच्या आरोग्याच्या हिताचा निर्णय घेण्यात यावा अशीमागणी या विद्यार्थ्यांनी केली. या आंदोलनात फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातील विद्यार्थी सहभागी झाले होते. हे आंदोलन फार्मसी कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष आकाश हिवराळे व उपाध्यक्ष प्रसाद मदने, ललित पाटील खानदेश विभाग अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.