कांद्याची भाववाढ : केंद्रीय मंत्र्याविरोधात तक्रार दाखल

ram vilas paswan

 

मुझफ्फरपूर (वृत्तसंस्था) कांद्याच्या वाढत्या भाववाढी बाबत केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप करत एका व्यक्तीने चक्क बिहारमधील मुझफ्फरपूर येथील कोर्टात तक्रार दाखल केली आहे.

 

राजू नय्यर यांनी न्यायधंडाधिकाऱ्यांकडे पासवानांविरोधात फौजदारी तक्रार केली आहे. या तक्रारीवर १२ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. एका वृत्तवाहिनीवर कांद्याच्या वाढत्या महागीवर पासवान यांनी केलेला दावा ग्राह्य नसल्याचे हेरत नय्यर थेट कोर्टात पोहचलेत. ‘कांद्याचा काळा बाजार होत असल्याने कांद्याचा तुटवडा भासत असल्याचा दावा पासवान यांनी केला होता.’ पासवान यांचा हा दावा म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. कांद्याचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले असताना सरकार त्यावर तातडीने उपाययोजना न करता जनतेची फसवणूक करत आहे, असा आरोप नय्यर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

Protected Content