रायगड प्रतिनिधी । उरण येथील ओएनजीसीच्या प्रकल्पाला आज सकाळी भीषण आग लागली असून यात काही कर्मचारी मृत्यूमुखी पडल्याची भिती आहे.
प्राप्त माहितीनुसार आज सकाळी सात वाजेच्या सुमारास उरण येथील ओएनजीसीच्या प्रोजेक्टला आग लागली. या प्रकल्पातील गॅस प्रोसेसींग युनिटमध्ये आग लागली असून काही मिनिटांमध्येच याने भीषण स्वरूप धारण केले. यात तीन जण गंभीररित्या भाजले गेले असून काही मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. या भीषण आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.