जळगाव प्रतिनिधी । शहरातील असोदा रोड परिसरातील दिनकर नगरात घरासमोर दुचाकी लांबविल्याची घटना आज समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दिनकर नगरात कैलास गंगाराम सोनवणे वय ३७ हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे एम.एच.१९. बी.वाय ८८६९ या क्रमाकांची दुचाकी आहे. सोनवणे यांनी सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराबाहेर दुचाकी उभी केली होती. सकाळी ६ वाजेच्या सुमारास सोनवणे कुटुंबिय उठल्यानंतर त्याला घरासमोर उभी त्यांची दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी सर्वत्र परिसरात शोध घेतला. मात्र दुचाकी मिळून आली नाही. अखेर कैलास सोनवणे यांनी तक्रारीसाठी शनिपेठ पोलीस स्टेशन गाठले. त्यांच्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल इंदल जाधव हे करीत आहेत.