भुसावळातून एकाची दुचाकी लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नमो हॉटेल गेटसमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १३ जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी बुधवार १७ जुलै रोजी दुपारी दीड वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतीक अनिल भारंबे वय-३४, रा. मुक्ताई कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो शनिवारी १३ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील नभो हॉटेल गेट समोर त्यांनी त्याची दुचाकी पार्क करून लागली होती. दरम्यान ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना समजल्यानंतर त्यांनी दुचाकीचा शोधाशोध केली, परंतु दुचाकी संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्याने बुधवारी १७ जुलै रोजी दुपारी दीड वाजता भुसावळ शहर पोलीसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ संदीप पालवे हे करीत आहे.

Protected Content