अनुराग स्टेट बँक कॉलनीतून एकाची दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनी परिसरातून एकाची ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याचा प्रकार ४ जानेवारी रोजी उघडकीला आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी ७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, उमेश प्रभाकर मराठे (वय-३२) रा. कांचन नगर प्रशांत चौक जवळ हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ४ जानेवारी रोजी सायंकाळी कामानिमित्त दुचाकी (एमएच १९ बीके ८२६२) ने जळगाव शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनी येथे हनुमान मंदिराजवळ आले होते. त्यांनी दुचाकी पार्किंग करून लावली होती. त्याचे खासगी काम आटोपल्यानंतर ते दुचाकीजवळ आले असता दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी दुचाकीचा परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही मिळून न आल्यामुळे त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत पाटील करत आहे.

 

Protected Content