भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विधानसभा निवडणूकीचे तिकीट मिळाले नाही या कारणावरून एकाला शिवीगाळ करत धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना भुसावळ शहरातील डी.एस.हायस्कूल कॉम्प्लेक्सजवळ घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती अखेर सायंकाळी साडेपाच वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सुशिल वसंत केदारे वय ४३ रा. सिध्दार्थ नगर, यावल हे आपल्या परिवारासह वास्तव्यासला आहे. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता ते भुसावळ शहरातील डी.एस.हायस्कूल कॉम्प्लेक्सजवळ असलेले होते. त्यावेळी सुरेश समाधान वानखेडे रा.भुसावळ हा जवळ आला, त्यावेळी तो सुशिल केदारे यांना म्हणाला की, तुझ्यामुळे माझ्या पत्नीला बसपा पक्षाचे विधानसभा निवडणूकीचे तिकीट मिळाले नाही असे बोलून शिवीगाळ करत सुशिलवर धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापत केली. दरम्यान जखमीवस्थेत सुशिल याच्यावर खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांनी उपचार घेतल्यानंतर सोमवारी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुरेश समाधाव वानखेडे रा. भुसावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अली इब्राहिम अली सैय्यद हे करीत आहे.