पैशांच्या वादातून एकाला तिघांकडून बेदम मारहाण

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पैशांच्या देवाणघेवाणावरून एकाला पकडून फायटर सारख्या वस्तूने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता आसोदा गावातील बसस्थानकाजवळ घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, एकनाथ कडू कोळी वय ४७ हे आपल्या जळगाव तालुक्यातील आसोदा येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता एकनाथ कोळी हे घरी असतांना पैशांच्या देवाणघेवाणावरून गावात राहणारे पंकज दिलीप कोळी, कैलास कोळी आणि दिलीप कोळी सर्व रा. आसोदा ता.जळगाव या तिघांनी फायटर सारख्या वस्तूने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली.

याप्रकरणी बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पंकज दिलीप कोळी, कैलास कोळी आणि दिलीप कोळी सर्व रा. आसोदा ता.जळगाव या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी हे करीत आहे.

Protected Content