Home क्राईम कौटुंबिक कारणावरून पत्नी व मुलाकडून एकाला बेदम मारहाण

कौटुंबिक कारणावरून पत्नी व मुलाकडून एकाला बेदम मारहाण


भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरी येथे कौटुंबिक वादातून प्रौढ व्यक्तीला पत्नी व मुलाकडून काठीने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी  गुरुवार १० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

वरणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विनोद प्रल्हाद तायडे (वय-४१) रा.काहूरखेडा ता. भुसावळ हे ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता  वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरी येथे राहणाऱ्या पत्नी शारदा विनोद तायडे व मुलगा रोहित विनोद तायडे यांच्यात विनोद तायडे यांचा कौटुंबिक कारणावरून वाद झाला. यात विनोद तायडे यांना पत्नी व मुलाने काठीने मारहाण करून गंभीर दुखापत करत शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर विनोद तायडे यांना भुसावळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गुरुवार १० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता विनोद तायडे यांनी वरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पत्नी शारदा विनोद तायडे व मुलगा रोहित विनोद तायडे या दोघांवर मारहाण केल्याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक नवीन अली सय्यद करीत आहे.


Protected Content

Play sound