उसनवारीच्या पैशांवरून एकाला लोखंडी पाईपाने मारहाण

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उसनवारीने घेतलेले पैसे आताच्या आता दे असे बोलून एका तरूणाला शिवीगाळ करत लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना बुधवारी १९ जून रोजी दुपारी दीड वाजता भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात घडली आहे. याप्रकरणी रात्री ११.३० वाजता भुसावळ शहर पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक असे की, स्वप्निल देविदास सुर्यवंशी वय ३२ हा तरूण आपल्या परिवारासह भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात वास्तव्याला आहे. स्वप्निलने गावातील रोहित अनिल सोनवणे यांच्याकडून उसनवारीने पैसे घेतले होते. त्यामुळे बुधवारी १९ जून रोजी दुपारी दीड वाजता रोहित सोनवणे हा उसनवारीने दिलेले पैसे घेण्यासाठी स्वप्निलकडे आला. उसनवारीने घेतलेले पैसे आताच्या आता दे असे सांगून रोहितने स्वप्निल सुर्यवंशी याला शिवीगाळ करत लोखंडी पाईने बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी स्वप्निलने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री ११.३० वाजता रोहित अनिल सोनवणे रा. कंडारी ता. भुसावळ याच्या विरोधात भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुपडा पाटील ह्या करीत आहे.

Protected Content