यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव येथे शेताच्या बांधावर गुरे चारण्याच्या कारणावरून एकाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, अनिल मधुकर पाटील (वय-४५) रा. आडगाव ता. यावल हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. शेती करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. १४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ते आडगाव शिवारातील शेतात काम करत असतांना. त्यांच्या गावातील विकास युवराज पाटील (वय-३५) आणि भारत युवराज पाटील (वय-३२) दोन्ही रा. आडगाव ता. यावल यांच्या मालकीचे गायी व गुरे ही अनिल पाटील यांच्या शेताच्या बांधावर चरत होते. यावल अनिल पाटील यांनी गुरे चारण्याचा कारणावरून जाब विचारल्याने विकास पाटील आणि भारत पाटील यांनी अश्लिल शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. आणि परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विकास पाटील आणि भारत पाटील यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेंद्र बागुले करीत आहे.