सत्संगातुन देवाचे नामस्मरण करावे – आनंदजी स्वामी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ईश्वराने आपल्याला अप्रतिम असा मानवी देह दिला आहे.त्यात सर्व प्रकारची ज्ञान इंद्रिय दिली आहे.मनुष्य जन्माला येतो तेव्हा मूठ बंद करून येतो आणि मृत्यूनंतर मूठ सोडून इहलोकी निघून जातो. यावेळी आपण मनुष्य म्हणून जन्मापासून ते मृत्युपर्यंत काय ईश्वरी सेवा केली. की फक्त मी मी म्हणत जगला याचा ही हिशोब परमात्मा करीत असतो. म्हणून मनुष्य जन्म सार्थकी करण्यासाठी सत्संगातून देवाचे नामस्मरण झाले पाहिजे. असा संदेश आपल्या प्रवचनातून धुळे स्वामी नारायण मंदिराचे कोठारी संत आनंदजी स्वामी यांनी दिला. पारोळा येथे श्री व्यंकटेश माध्यमिक विद्यालयाच्या पाठी मागे श्री स्वामी नारायण मंदिराच्या नियोजित जागेवर यावेळी ते प्रवचन करीत होते. त्यावेळी उपस्थित भक्तांना हा अमूल्य संदेश त्यांनी दिला.या आधी त्यांनी श्री व्यंकटेश माध्यमिक शाळेत सदिच्छा भेट त्यांनी दिली. त्यांचे स्वागत आणि सत्कार संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब भोसले, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, मुख्याध्यापक यु.जी. पाटील, राजेश पाटील यांनी केले.यावेळी आपल्या सत्संगातून त्यांनी माणसाला आपली बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी देवाचे नामस्मरण रोज केले पाहिजे असे सांगितले.

ज्ञाना शिवाय विद्या नाही. ज्ञान प्राप्ती साठी ईश्वराचे ध्यान धारणा करावी जीवनात आपण कितीही मोठे झालो तरी आई वडिलांची सेवा ही देवा प्रमाणे करावी असा ही उपदेश आनंदजी स्वामी यांनी यावेळी केला. विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जी अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून आपले ठरविलेले ध्येय गाठावे असे सांगितले. शेवटी आपल्या हातून चांगली सेवा घडवा मरावे कीर्ती रुपी उरावे असे काम करून जा असा उपदेश यावेळी स्वामी नी केला.त्यांच्या समवेत पुरुषोत्तम स्वामी, मनोज भाई होते. यावेळी केशव क्षत्रिय, किशोर पटेल, सुभाष चौधरी, रावसाहेब भोसले, राजेश पाटील, माधवराव पाटील, डॉ काटे, अँड आदित्य पाटील, सुरेश चौधरी, विजय पाटील, वकील आप्पा, दिलीप चौधरी, विक्रम पाटील, बेलदार आप्पा, भूषण चौधरी, गोकुळ चौधरी, बीएपीएस संस्थेचे बाल कार्यकारी मंडळ व बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content