जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामानंद नगर येथील गिरणा पाण्याची टाकीजवळ दारू पिण्याच्या जागेवरून वाद झाल्याने मुलाला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याबाबत रात्री ११ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी हा रविवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंदनगर येथील गिरणा पाण्याच्या टाकीजवळ दारू पित असतांना याठिकाणी संयोग अशोक पातोडे, पप्पू शंकर कोकाटे आणि एक अनोळखी व्यक्ती सर्व राहणाार हरीविठ्ठल नगर, जळगाव यांनी दारू पिण्याच्या जागेवरून रणजितसिंग जुन्नी याच्या सोबत वाद घातला. त्यानंतर तिघांनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि यातील एकाने धारदार चाकू काढून रणजितसिंग यांच्या पाठीवर आणि डाव्या डोळ्यावर वार करून जखमी केले. जखमी झालेल्या रणजितसिंग याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उषा सोनवणे ह्या करीत आहे.




