पहूर. ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील पहूर परिसरात अपघाताची मालिका थांबता थांबत नाही आहे.
आज दि. 15 रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास गणेश प्रभाकर नेवेस्कर (वय 58) राहणार गरुड प्लाट,भुसावळ हे त्यांच्या ऍक्टिवा क्रमांक एम. एच. 19 बी. एस. 9223 ने शेंदुर्णी येथून भुसावळकडे जात असतांना सोनाळा फाटा जवळ त्यांची एक्टिवा गाडी रस्त्यावर घसरली.
या अपघातात गणेश नेवेस्कर यांच्या डोक्याला व तोंडाला दुखापत झाली. 108 रुग्णवाहिकेला माहिती मिळताच चालक अमजद खान व डॉ. लियाकत अब्बासी तात्काळ घटनास्तळी जाऊन जखमीस पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.याठिकाणी डॉक्टर मयुरी पवार यांनी उपचार केले.