
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील करंज गावात राहणारे ४३ वर्षीय व्यक्तीला सर्पदंश झाल्याने त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना रविवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुधाकर शामराव सपकाळे वय ४३ रा. करंज ता.जळगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील करंज गावात सुधाकर सपकाळे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. रविवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी ते घरी असतांना त्यांचा सापाने चावा घेतला. त्यामुळे त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्यावर उपचार सुरू असतांना दुपारी ४ वाजता त्यांचा मृत्यू झाला. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी होती. यावेळी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ योगेश पाटील हे करीत आहे.



