Home क्राईम साकळी येथे उधारीचे पैसे मागितल्याने एकास मारहाण

साकळी येथे उधारीचे पैसे मागितल्याने एकास मारहाण


hqdefault 1

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील साकळी येथे उधारीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या एका जणास पैसे न देता मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली, याबाबत येथील पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

साकळी येथील युवराज केदार भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील भवानी मंदिराजवळ राहणाऱ्या कैलास केशव बडगुजर यांच्याकडे त्यांचे हात उसनवारीचे एक हजार रुपये घेणे होते. शुक्रवारी सायंकाळी ते पैसे मागण्यासाठी गेले असता बडगुजर यांनी त्यांना पैसे न देता त्यांच्या तोंडावर बुक्याने वार करीत मारहाण केली. त्यात त्यांना जबर दुखापत झाली आहे. याबाबत त्यांनी यावल पोलिसात बडगुजर याच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound