अमळनेर (प्रतिनिधी)। अमळनेर येथील पैलाड परिसरातील रहिवाशी ज्ञानेश्वर पाटील (वय 43 ) काही दिवसापासून निराश होता. त्यातून नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. सविस्तर माहिती अशी की, ज्ञानेश्वर पाटील हा गेल्या काही वर्षापासून आपल्या आईसोबत राहत होते. दहा वर्षापासून त्याची पत्नी व मुली विभक्त झाल्यामुळे ते आई बरोबर राहत होते. आज सकाळी 10.30 वाजता आई बाजारात गेली असता घरात कोणीही नसतांना घराचा दरवाजाचा कडीकोडा लावून त्याने गळफास लावून आत्महत्या केली.
दार उघडताच आई फोडला हंबरडा
आई बाजारातून आल्यानंतर आईने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजातूनच बंद असल्यामुळे आजूबाजूच्या नातेवाईकांना बोलवले. दरवाजा उघडल्यानंतर मुलाचा आत्महत्या केल्याचे पाहून हंबरडा फोडला. आपल्या हृदयाला लावले. सदर मयत व्यक्ती गणेश पाटील हे बिगारीचे काम करीत होता. खिशात आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिलेली मिळून आली. त्यात म्हटले आहे की, मी माझे जीवन संपवली आहे त्याला कोणीही जबाबदार नाही. त्याच्यामागे आई पत्नी व दोन मुले आहेत. सदर घटनेची आकाश मत मृत्यूची नोंद अमळनेर पोलीस स्टेशनात केली गेली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल साळुंखे करीत आहेत.