Home क्राईम घरगुती वादातून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

घरगुती वादातून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न


 

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आमोदा येथे एका 35 वर्षीय व्यक्तीने घरातील किरकोळ कारणावरून घरात विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. विष प्राशन केलेल्या व्यक्तीचे नाव शाम चंपालाल बारेला (वय 35) असे असून त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

 

शाम चंपालाल बारेला हे बऱ्हाणपूर मध्यप्रदेश हे मूळ राहणारा आहे. तो सध्या कामानिमित्त आमोदा येथे आपल्या पत्नीसह मागील तीन वर्षापासून राहतोय. आज सकाळी कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात शामने विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांनी तातडीने उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे कळते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound