सुतारवाड्यातील एकाने संपविले जीवन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल शहरातील सुतार वाडा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तिने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असुन , याबाबत पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार गोकुळ भिका सपकाळे (वय ५२) रा. सुतार वाडा यावल या व्यक्तिने १४ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या दुसऱ्या खोलीच्या छताच्या एंगलला ओढनीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. याबाबत संदीप भगवान कोळी यांनी खबर दिल्यावरून आक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण व पोलीस तपास करीत आहे. दरम्यान यावल च्या ग्रामीण रूग्णालयात गोकुळ सपकाळे यांच्या मृतदेहा चे शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.

Protected Content