भीषण अपघातात एकजण ठार: नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दुचाकीवरुन घराकडे जात असलेल्या निलेश केशव बारी वय ४४, मूळ रा. शिरसोली, ह. मु. शास्त्रीनगर हे अचानक समोर आलेल्या कारवर धडकले. या विचित्र अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १३ जुलै रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास रामदास कॉलनीत घडली. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

मूळचे शिरसोली येथील निलेश बारी हे सद्या कुटुंबियांसह गिरणा टाकीपरिसरातील शास्त्री नगरात वास्तव्यास होते. शेती करुन ते आपल्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ते सागरपार्ककडून घराकडे जात असतांना रामदास कॉलनीतील हनुमान मंदिराच्या गल्लीतून एमएच १६, बीवाय ७५५५ क्रमांकाच्या कारने जात होते. यावेळी अचानक कार समोर आल्याने दुचाकीस्वार निलेश बारी यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते समोर आलेल्या कारवर आदळले. हा अपघात इतका जोरदार होता की, दुचाकीस्वार हे थेट कारच्या दरवाजावरील काचवर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निलेश बारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्या शरिरातून रक्तस्त्राव सुरु होता. ते रक्ताच्या थारोळ्यात सुमारे अर्धा तासापर्यंत पडलेले होते. यावेळी त्याठिकाणाहून जाणाऱ्या एका तरुणाने जखमी बारी यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. अमोल पाटील यांनी तपासणी करत मयत घोषीत केले. बारी यांना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता अशी चर्चा रुग्णालयात सुरु होती.

निलेश बारी यांच्या खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली. दरम्यान, काही तरुणांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली. त्यानुसार निलेश बारी यांचे वडील व पत्नीने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांचा मृतदेह बघताच त्यांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.

Protected Content