बसच्या टपवरून स्टेपनी पडून झालेल्या अपघातात एक ठार; एक गंभीर

download

जळगाव (प्रतिनिधी)। धावत्या बसवरून टपावर ठेवलेली स्टेपनी रस्त्यावर पडल्याने ती थेट दुचाकीस्वाराच्या डोक्यात घूसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील करंज-सावखेडा खुर्द गावाच्या दरम्यान मंगवारी 5 मार्च रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. तर दुचाकीवर मयताच चुलत भाऊ गंभीर दुखापत झाली असून त्याला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून रूग्णालया नातेवाईकांची एकच गर्दी जमली होती. या घटनेप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, सावखेडा खुर्द येथील घनशाम उमाकांत पाटील (वय 37) व तापीराम माधवराव पाटील (वय 36) हे दोघे चुलत भाऊ आहेत. मंगळवारी दुपारी दोघे भाऊ दुचाकी क्रमांक (एमएच 19 सीपी 0843) ने जळगावकडून गावाकडे परतत होते. करंज गावापासून काही अंतर पुढे जाताच समोरुन येणार्‍या एसटी बस क्रमांक (एमएच 20 बीएल 2414) च्या टपावर ठेवलेली स्टेपनी अचानक रस्त्यावर पडली. टायरमध्ये हवा असल्यामुळे स्टेपनी रस्त्यावर एक टप्पा पडून दुसरा टप्पा थेट घनशाम व तापीराम यांच्या डोक्यावर पडला. यामुळे दोघांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. यात घनशाम यांना जागेवरच मृत्यू झाला. तर तापीराम गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर बसचालक देविदास कोळी व वाहक विशाल थोरात यांनी अंतरावर बस थांबवली. सावखेडा गावातील सुरेश पाटील यांनी धटनास्थळी धाव घेतली व नंतर घरुन चारचाकी आणून त्यात दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. तत्पूर्वी घनशाम यांचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रूग्णालयात धाव घेतली होती.

Add Comment

Protected Content