Home Cities अमळनेर विहिरीचे खोलीकरण बेतले जीवावर : दरड कोसळून एक ठार, दोघे जखमी

विहिरीचे खोलीकरण बेतले जीवावर : दरड कोसळून एक ठार, दोघे जखमी

0
44

अमळनेर (प्रतिनिधी) तालूक्यातील आर्डी येथे विहिरिचे खोलीकरण करणाऱ्या मजूरांच्या अंगावर दरड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी धूळे येथे दाखल करण्यात आले आहे.

 

अमळनेर शहरापासून १० कि मी. अंतरावर असलेल्या आर्डी गावात अमळनेर येथील छोटू वैद्य यांच्या शेतात मंगरूळ येथील मजूर विहिरिचे खोलीकरणचे कामकरीत होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बिपिन मूरलीधर पाटील (वय ३२) या मजूराच्या अंगावर दगडी दरड कोसळल्याने त्याच्या शरीराचा चेंदामेंदा होवून जागीच मृत्यू झाला. तर पुनमचंद शांताराम पाटील (वय ४१) व अशोक भावराव मोतीराळे (वय ४२) हे गंभिर जखमी झाले. घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मयत बिपीनचा मृतदेह बाहेर काढून ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला तर गंभिर जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उ पचारासाठी रवाना करण्यात आले. यात पुनमचंद यास धूळे खाजगी रूग्णालयात तर अशोक मोतिराळे यास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound