Home क्राईम मोटरसायकलला ट्रकची धडक; एक ठार

मोटरसायकलला ट्रकची धडक; एक ठार

0
37

भुसावळ प्रतिनिधी । सावदा येथून भुसावळ कडे जात असताना ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यामधील जालना तालुक्यातील मालगाव येथील हिरालाल रघुनाथ बारेला वय २५ हा सध्या सावदा येथे राहत असून मजुरी निमित्त सावदा ते भुसावळ विना क्रमांकाच्या मोटरसायकलवरून जात होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील बामणोद जवळ असलेल्या विकास सोसायटी जवळ एमएच १९ झेड ५८२५ ला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तो चाकाखाली येऊन ठार झाला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound