विद्यापीठात एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय योग कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योग मार्गदर्शन केंद्रामार्फत दिनांक ५ ऑगस्ट २०२३ शनिवार रोजी महाराष्ट्र १८ एसीसी बटालियन सेनेच्या ६०० विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय योग कार्यशाळा पदवी प्रदान सभागृह येथे घेण्यात आली. हा योगवर्ग सकाळी ८ ते ९ या वेळेत घेण्यात आला.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक योग मार्गदर्शन केंद्र प्रमुख व विद्यापीठ उप अभियंता  इंजि.राजेश पाटील यांनी केले, आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थी जीवनात योगाचे महत्व पटवून सांगितले. विद्यापीठात सुरु होत असलेल्या योगातील पदव्युत्तर पदवी व प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची माहिती दिली. डॉ. लीना चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे तसेच ओंकार साधनेचे  प्रशिक्षण दिले. योगशिक्षिका लिना चौधरी व माधवी तायडे  यांनी सहशिक्षक म्हणून कार्य केले. त्यात ओंकार  प्रार्थना व सूर्यनमस्कार घेण्यात आले.

Protected Content