इकरा थीम महाविद्यालयात जीपीएस विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एच. जे. थीम महाविद्यालयाच्या भूगोल विभागा तर्फे जागतिक स्थिती प्रणाली (जीपीएस) (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) विषयावर एक दिवसीय कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यशाळेचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून प्रा. योगेश कोळी, नूतन मराठा महाविद्यालय जळगाव उपस्थित होते.

कार्यशाळेची सुरुवात कुरान पठणाने करण्यात आली. या कार्यशाळेच्या अधक्ष्यास्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चांद खान होते. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात जीपीएस तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती देण्यात आली. तदनंतर जागतिक स्थिती प्रणालीचा वापर, त्याचे शास्त्रीय आधार, नकाशांकन, ट्रॅकिंग व त्याचा विविध क्षेत्रातील उपयोग याविषयी सखोल माहिती दिली.

कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांना भौगोलिक माहिती प्रणाली (GIS), भूगोल, सर्वेक्षण आणि नेव्हिगेशन यासारख्या क्षेत्रांमध्ये जीपीएसचा कसा उपयोग करता येतो, याविषयी माहिती मिळाली. कार्यशाळेच्या तृतीय सत्रात उपस्थित विद्यार्थ्यांना जीपीएस उपकरण हाताळण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात मैदानात जाऊन जीपीएस उपकरणाद्वारे सर्वेक्षण केले. प्रशिक्षणात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेत उप-प्राचार्य डॉ. तन्वीर खान, उप-प्राचार्य डॉ. वकार शेख, हिंदी विभाग प्रमुख डॉ. राजेश भामरे, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. युसुफ पटेल यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे सूत्र संचलन डॉ. अमिनुद्द्दिन काज़ी यांनी केले तर आभार प्रदर्शन भूगोल विभाग प्रमुख डॉ. इरफ़ान शेख यांनी केले. डॉ. राजू गवरे यांनी कार्यशाळेच्या समन्वयकाची जबाबदारी पार पडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालय प्रशासन व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

Protected Content