धनाजी नाना महाविद्यालयात मॉडर्न प्रोस्पेक्टिव्ह इन फिजिकल अँड केमिकल सायन्सेस एकदिवसीय राष्ट्रीय परिषद

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूरच्या ऐतिहासिक भूमीचे बालपणापासूनच आकर्षण होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्या भूमीने देशाला नवविचारांची दिशा दिली. देशाचे स्वातंत्र्याचे विचार रुजविले, दलित, आदिवासी, व वंचितांना मुख्य प्रवाहात आणले. त्याच भूमीत मॉडर्न प्रोस्पेक्टिव्ह इन फिजिकल अँड केमिकल सायन्सेस या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयासाठी दिशादर्शक अश्या संशोधनावर उपयुक्त चर्चा होऊन समाज उभारणी साठी भरीव कामगिरी होईल असा आशावाद प्रोफेसर सुनील भिरूड कुलगुरू सी ओ इ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे यांनी व्यक्त केला. ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत उद्घाटक म्हणून बोलत होते. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम उषा) व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या सहकार्यातून एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष शिरीषचौधरी अध्यक्ष तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर यांच्यासहित श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी चेअरमन, श्री मुरलीधर तोताराम फिरके सचिव, माजी प्राचार्य डॉक्टर जी पी पाटील नियामक मंडळ सदस्य, श्री संजय काशिनाथ चौधरी नियमक मंडळ सदस्य यांच्यासहित डॉ आशुतोष बेडेकर वडोदरा, डॉ विपुल खेराज सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरत, प्रा सचिन येवले विभाग प्रमुख रसायनशास्त्र विभाग पी ओ नाहाटा महाविद्यालय भुसावल, प्राचार्य डॉ आर एल चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी, प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य डॉ के जी कोल्हे यांच्यासहित देशभरातून आलेले प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

याप्रसंगी उद्घाटक माननीय कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरूड यांनी फैजपूर या भूमीचा ऐतिहासिक वारसा अत्यंत प्रेरणादायी असूनही समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यात अपयश आले असल्याचे शक्य आहे तरी आपण प्रत्येक शाळा महाविद्यालय व विविध आस्थापनांच्या माध्यमातून फैजपूर भूमीचा ऐतिहासिक इतिहास जनमानसापर्यंत पोहोचला पाहिजे व यातून नवभारताच्या निर्मितीसाठी विविध क्षेत्रातील कार्यशाळा, परिषदा व अधिवेशने यांचे आयोजने झाले पाहिजेत. फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयातील राष्ट्रीय परिषद येणाऱ्या काळासाठी मार्गदर्शक ठरेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अध्यक्षिय समारोपात शिरिषचौधरी यांनी कुलगुरू प्राध्यापक सुनील भारुड हे भूमिपुत्र असून शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील नामांकित विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून स्थानापन्न असल्याचा प्रचंड अभिमान असल्याचे मत व्यक्त केले. यासोबतच येणाऱ्या काळात दिशादर्शक ठरणारी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे व सर्व आयोजकांचे हार्दिक अभिनंदन करीत अनेकोत्तम शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी केले त्यात राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनामागील हेतू व गतकाळात महाविद्यालयाने विविध क्षेत्रात केलेली घोडदौड याचा परामर्श घेतला व येणारा काळ महाविद्यालयात साठी अत्यंत भरभराटीचा असेल असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या वतीने शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या अव्यवसायिक गटातील उत्कृष्ट महाविद्यालय चा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल तापी परिसर विद्या मंडळ पदाधिकारी महोदयांचा सन्मान करण्यात आला. उद्घाटन समारंभाचे आभार प्रदर्शन ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ. हरीश तळेले यांनी केले.

एकदिवशीय परिषदेत केमिकल सायन्स आणि फिजिकल सायन्स या विषयातील तज्ञ बोलावण्यात आले असून त्यात डॉ आशुतोष बेडेकर वडोदरा, प्रोफेसर दीपक दलाल, डायरेक्टर स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, प्रो बाबासाहेब डोळे छत्रपती संभाजीनगर, प्रो डॉ सचिन येवले विभाग प्रमुख पी ओ नाहाटा महाविद्यालय भुसावळ यांची मार्गदर्शन सत्रे झालीत. त्यात केमिस्ट्री आणि फिजिक्स या विषयातील संभाव्यता यावर सादरीकरण होऊन सहभागी संशोधकांसोबत चर्चा झाली. यानंतर पोस्टर प्रेसेंटेशन व ओरल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सादरीकरण केली. परिषदेच्या समारोप समारंभ प्रसंगी सहभागी संशोधक प्राध्यापक विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करीत…

Protected Content