जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवाजीनगरातील रेल्वे उड्डाणपूलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात शिवाजीनगर वासियांनी महावीर जिनिंग समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता अजून वर्षभर या पुलाचे काम सुरू राहणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर सदर पुलाचे काम सुरु झाले. करोडो रुपये खर्च करून होणार्या पुलाविषयी आनंद वाटण्याऐवजी सर्वत्र नाराजी पसरली आहे. सर्व लोकप्रतिनिधी विकास कामे व्हावी, म्हणून वेळोवेळी प्रयत्न पाठपुरावा करतात व निधी आणतात. परंतु सरकारी अधिकारी व ठेकेदार यांच्या नाकर्तेपणामुळे विकास कामे मार्गी लागत नाही. ठेकेदाराला या कामासाठी तीन वेळा मुदतवाढ देऊन देखील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेला नाही. दरम्यान ठेकेदाराकडून काम होत नसल्यास ठेकेदाराचे टेंडर रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी ॲड. दिलीप पोकळे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, भैय्या जोहरे, विजय राठोड, पृथ्वीराज मोरे, नीलेश इंगळे, योगेश चौधरी, नवल सपकाळे, उमाकांत वाणी, भगवान धनगर, अशोक सोनवणे, रत्नाकर चौधरी, दिलीप मालुसरे, बापू महाजन, गफार अली जब्बर अली सैय्यद, श्रीकांत पाटील, प्रतिभा देशमुख, उत्तम शिंदे, गुणवंत राजहंस, गणेश शेळके, दीपक माने, आकाश मोरे यांच्यासह शिवाजी नगरातील रहिवासी यांनी एक दिवशीय धरणे आंदोलनात सहभाग नोंदवला होता.