जळगाव प्रतिनिधी । शहरातील अयोध्यानगर परीसरातील सदगुरू नगर येथील व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, गणेश भिकनचंद जोशी (वय-40, रा. सदगुरू नगर, अयोध्यानगर परीसर) यांनी घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याचे नातेवाईक संजय मदनलाल चितलांग यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केला. परंतू वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गणेश जोशी हे मार्केट बाजार समितीत कॉमिशन एजंट म्हणून काम करतात. त्यांच्या पश्चात, दोन मुले, भाऊ, असा परिवार आहे, ते चंदन जोशी यांच्या पुतण्या होत.