खेडी येथे एकाला तिघांकडून बेदम मारहाण; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी येथे एकाला काहीही कारण नसतांना तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विजय पाडूंरग मराठे (वय-४५) रा. खेडी बुद्रुक ता.जि.जळगाव हे खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. शनिवार १५ मे सायंकाळी ७ वाजता रोजी जळगाव भुसावळ रोडवरील नूपूर हॉटेलजवळ घरी जात असतांना गणेश उर्फ मेंबर कोळी रा. अयोध्यानगर, बबलू कोळी आणि मनोज सपकाळे दोन्ही रा. जैनाबाद यांन काहीही कारण नसतांना विजय मराठे याला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान तिघांविरोधात पोलीसांत तक्रार देण्यासाठी जात असतांना विजय मराठे व त्याचा भाऊ सचिन मराठे यांना आडवणूक करून पोलीसात तक्रार दिली तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विजय मराठे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय विशाल सोनवणे करीत आहे. 

 

Protected Content