एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील टोळी खुर्द येथे जिल्हा परिषद शाळेतील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर पाच जणांनी मिळून एकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल तालुक्यातील टोळी खुर्द येथे जिल्हा परिषद शाळेतील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर लसीचा डोस घेण्यासाठी शरद मराठे हे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गेले असता रांगेत उभे राहण्यावरून बाळू मराठे, भुरा मराठे, आबा मराठे, अमोल मराठे, शरद मराठे, पांडुरंग मराठे अश्यांनी शरद मराठे यांना मारहाण केली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.