Home क्राईम गावठी पिस्तूलासह एकाला अटक; रामानंद नगर पोलीसांची कारवाई

गावठी पिस्तूलासह एकाला अटक; रामानंद नगर पोलीसांची कारवाई

0
219


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरामध्ये अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्या एका संशयीत आरोपीला रामानंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्राळा हुडको परिसरातील सराईत गुन्हेगार महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे हा हातात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना शनिवारी १३ सप्टेंबर रोजी होता. त्याच्या दहशतीमुळे परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद करण्यास सुरुवात केली होती.

​या गंभीर परिस्थितीची दखल घेत पोलीस निरीक्षक गुंजाळ यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला महेंद्र सपकाळेला पकडण्याचे आदेश दिले. पथक पिंप्राळा हुडको परिसरात त्याचा शोध घेत असताना, तो पिंप्राळा रोडकडे पळत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि खंडेराव नगरकडे जात असताना त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ​यावेळी, त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या महेंद्र उर्फ दादू सपकाळेवर यापूर्वी रामानंद नगर पोलीस ठाण्यात ५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.


Protected Content

Play sound