अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात भागात राहणाऱ्या अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीला नोट दाखवून तिच्यासोबत अश्लिल चाळे करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घडली. याबाबत रात्री ८ वचाजता मारवड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावातील अकरा वर्षीय आपल्या परिवारासह राहते. मंगळवारी १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पिडीत मुलगी ही शाळेत जाण्यासाठी बसस्थानकाजवळ बसची वाट बघत होती. त्यावेळी गावात राहणार हनुमंत यादव पाटील याने पिडीत मुलीला दुरून नोट दाखविली व जवळ बोलविले. त्यावेळी मुलगी ही जवळ गेल्यानंतर तिला जवळच असलेल्या खळ्यात नेवून तिच्या सोबत अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलगी ही घरी असल्यानंतर हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या वडीलांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी हनुमंत यादव पाटील रा. अमळनेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते हे करीत आहे.




