Home क्राईम केऱ्हाळा येथे गोवंशाचे मांस विक्रीप्रकरणी एकाला अटक

केऱ्हाळा येथे गोवंशाचे मांस विक्रीप्रकरणी एकाला अटक


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील के-हाळा बु. येथील इंदिरा नगर भागात खुल्या जागेत गौवंशाचे मास विक्री करणाऱ्या एका इसमावर रावेर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सुमारे ११० किलो मास जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे २२,००० रुपये इतकी आहे. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना के-हाळा बु. गावात एक इसम अवैधरित्या गौवंशाचे मास विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांना कारवाईचे आदेश दिले. उपनिरीक्षक तांबे यांनी पोलिस पथक तयार करून के-हाळा इंदिरा नगर परिसरात छापा टाकला.

कारवाईदरम्यान शेख पिरु शेख लाल (वय ५५, रा. कुरेशी वाडा, रसलपुर) हा इसम गौवंशाचे मास विक्री करताना रंगेहाथ आढळून आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप गाढे यांच्या तपासणीत हे मास गौवंशाचे असल्याचे निष्पन्न झाले.पोलिस नाईक श्रावण भील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोउनि घनश्याम तांबे यांच्यासह पोहेकॉ सुनील वंजारी, नितीन डांबरे, योगेश महाजन व पोकॉ राहुल परदेशी यांनी सहभाग घेतला.


Protected Content

Play sound