अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चार खांदेकरी एक मडके धरी असं म्हटले जाते. शेवटच्या क्षणी वंशाचा दिवा आपल्या पित्याला अग्निडाग देतो. मुलगा नसेल तर पुतण्या किंवा भाऊबंधकीतला पुढे येतो. मात्र आज कळमसरेतील प्रत्येकाला अभिमान वाटावा असा दुःखद क्षणी आपल्या जन्म देत्या पित्याचा वंशाचा दिवा आम्हीच म्हणत येथील भास्कर दयाराम बोरसे (वय -45) यांचे आज ता. 22 रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मुलींचा आधारवड हिरावल्याने त्यांना अश्रू अनावर असताना आपल्या पित्याला अखेरचा निरोप देतांना आम्हीच खांदेकरी व अग्नीडाग देऊ असा प्रस्ताव त्यांनी नातेवाईक व भाऊबंधकी यांना देत मान्य करीत आपल्या पित्याला अखेरचा निरोप दिला. यावेळी मात्र सर्व ग्रामस्थ व नातेवाईक यांना सार्थ अभिमान वाटावा असा क्षण यावेळी अनुभवला.
भास्कर बोरसे यांना तीन मुली पत्नी संगीता व म्हातारे वडील दयाराम बोरसे यांच्यासोबत मोल हात मजुरी करीत आपल्या मुलींना शिक्षण देत होते. मोठी मुलगी दिपाली, दुसरी कोमल यांनी पदवी पर्यंत शिक्षण घेत वडिलांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची असल्याने पुणे येथे आपल्या मामाकडे राहत कंपनीत कामाला आहेत. तर लहान मुलगी हेमलता ही यावर्षी दहावीला आहे. लहान बहिणीचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी दोघे मोठ्या बहिणी स्वप्न पाहत असताना वडिलांच्या आजारपणात त्यांनी काळजीही घेतली. घरात अठराविश्व दारिद्र्य असताना भास्कर बोरसे यांच्या पत्नी आजारी पती व म्हातारे सासरे यांची काळजी घेत रोज शेतात हात मजुरीचे कामाला जाणे हे नित्याचे आहे. मात्र गेल्या दोन महिण्यापासून भास्कर बोरसे हे आजारी असल्याने पत्नी संगीता, मुली दीपाली, कोमल यांनी दवाखानाही केला. ज्या बापाला आपल्याला तीन मुली आहेत याचे कधीही दुःख नव्हते तर त्या माझ्या वंशाचा दिवा आहेत. असेच नेहमी म्हणत असे तीनही मुली शाळेत हुशार असल्याने वडिलांना मोठा गर्व होता. मोलमजूरी करीत मुलींचे शिक्षण आई वडिल करीत आहेत याचीही जाणीव मुलींना असताना आपणच आपल्या आई वडिलांचे भाविष्यातले आधार असे त्या नेहमी म्हणत असत.मात्र त्या मुलींचा आधारवडच आज जागतिक कन्या दिवशी हिरावल्याने मुलींना अश्रू अनावर होते.तीनही बहिणींनी आपल्या वडिलांची काळजी घेत शेवटच्या क्षणी त्यांनी घेतलेला निर्णय हा मुलगा मुलगी भेदभाव करणाऱ्याना मोठी चपराक असून गावासह तालुक्याला या मुलींचा अभिमान असल्याची चर्चा सर्वत्र आहे.