आश्वासनानंतर सहाव्या दिवशी निळे निशान संघटनेचे आमरण उपोषणाची सांगता

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदिवासी समाजासह दलीत समाजाच्या हिताच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या निळे निशासन संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांचे आमरण उपोषण अखेर सहा दिवसानंतर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या लेखी आश्वासनाने सोडविण्यात आले.

यावल पंचायत समिती समोर अनुसुचित जाती व जमातीच्या लोकांना न्याय मिळवण्या करिता संघटनेतर्फेत ३ ऑक्टोबर रोजी पासून आंदोलन करण्यात सुरूवात केली होती. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून उडावाउडवी चे उत्तर न मिळाल्यामुळे ठिय्या आंदोलनाचे रुपांतर आमरण उपोषणात झाले. ५ ऑक्टोंबर पासून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी विविध मागण्या केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने भालशिव ग्रामपंचायत अंतर्गत टेंभीकुरण गाव ते पाटसरी रस्त्याचे काम तात्काळ करून घेण्याचे यावल तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आश्वासन दिले.

तसेच टेभीकुरण गावातील अनु – जाती जमातीच्या लोकांच्या मुलभुत सुविधा व झालेल्या अन्यायाच्या संदर्भात चौकशी कामी त्रीसदस्य समिती गठीत करून चौकशी करण्याचे आदेश जिल्हापरिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी लेखी पत्र संघटनेला यावल तहसिलदार मोहनमाला नाझरिकर यांच्याहस्ते दिले. त्याप्रसंगी यावल पो.स्टे. पोलीस निरीक्षक ठाकुर साहेब व सहा गटविकास अधिकारी उपस्थित होते.

उपोषण सोडतांना संघटेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी सांगीतले की ही लढाई कुठल्याही मुलभूत सुविधा करीता नसून दलीत आदिवासी समाज्याच्या मानसन्मानाची होती . तरी या आंदोलनाच्या यशस्वीते करिता इकबाल तडवी, अनिल इंधाटे, विलास तायडे, सागर तायडे, अनिल तायडे, डोमा सोनवणे, मिलिंद सोनवणे, जंगलू बारेला यांनी परिश्रम घेतले.

Protected Content