रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर विधानसभेसाठी आज दुसऱ्या दिवशी नऊ इच्छुक उमेदवारांनी २७ उमेदवारी अर्ज घेतले आहे. आता पर्यंत १९ इच्छुक उमेदवारांनी ५५ उमेदवारी अर्ज घेतल्याचे निवडणूक निर्णय अधीका-यांनी सांगितले आहे.
रावेर विधानसभेसाठी आज अमोल हरीभाऊ जावळे, (भालोद) अनिल छबिलदास चौधरी, (रावेर) डॉ. कुंदन सुधाकर फेगडे, (यावल) युवराज भालेराव, (चिनावल) हसन तडवी, (लोहारा) दगडूशहा करीम शहा, (सावदा) प्रविण चौधरी, (आमोदा) यांनी आज उमेदवारी अर्ज घेतले आहे. दि. २२ रोजी १० उमेदवारांनी २८ अर्ज घेतले तर आज नऊ उमेदवारांनी २७ अर्ज घेतले आहे. अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.