जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयात गन्हेगारी टोळया निष्पन्न करण्यात आल्या आहेत. तसेच गुन्हेगारी टोळयांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत असून या टोळयांना आर्थिक पाठबळ पुरविणार व पडदयामागुन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या लोकांवर जळगाव पोलीस दलाकडून माहिती जमा करण्यात आली आहे. अशा लोकांवर लक्ष ठेवून, असल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी गणेशोत्सव आणि मोहरमनिमित्त असणाऱ्या पोलीस बंदोबस्ताची तसेच जिल्ह्यातील तडीपार व वेगवेगळ्या प्रकरणातील गुन्हेगारांची माहिती दिली. यानुसार जिल्ह्यात सार्वजनिक,खाजगी आणि एक गाव एक गणपती असे मिळून एकूण २३२१ गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. तर मोहरम निमित्त १५९ सावरींचे जागेवर विसर्जन, मिरवणूक ८३५ असल्याचेही सांगितले.
असा आहे पोलीस बंदोबस्त
पोलीस अधीक्षक,अपर पोलीस अधीक्षक (२), उपविभागीय पोलीस अधिकारी (१०), पोलीस निरीक्षक (३२), वायरलेस पोलीस निरीक्षक (०२),सपोनि/पो.उप.नि.(९०),प्रोबश्नरी पो.उप.नि.नाशिक (२०),सीआयडी पुणे पोलीस निरीक्षक (०५), नवप्रविष्ठ पोलीस शिपाई (१०० पुरुष,१०० महिला), पोलीस कर्मचारी (२६००), होमगार्ड (१८००),एसआरपीएफ (१ कंपनी,अमरावती), रॅपीड अॅक्शन फोर्स (१ कंपनी), आरसीपी प्लाटून (०८),स्ट्रायकिंग फोर्स (१६), क्युआरटी पथक (४ पथकं)
जळगाव जिल्हयातुन तडीपार केलेल्या आरोपींची संख्या
2017 : 12
2018 : 13
2019 : 49
पोलिसांनी २०१७ मध्ये तडीपार केलेल्या आरोपीतांचे नाव पत्ता
गजानन उर्फ गन्या विलास बाविस्कर वय 23 वर्षे,रा.शिवाजीनगर हडको जळगाव,रईस समशेर पठाण वय 19 वर्षे,रा.गेंदालाल मिल जळगाव,चेतन विजय पाटील रा.शिव कॉलनी प्लॉट नं.150,गट नं.61 जळगाव,हर्षल सुनिल भावसार रा.शिव कॉलनी प्लॉट नं.11.गट नं. 57 जळगाव,गेविदा भागिरथ जाधव (राठोड) रा.समतानगर जळगाव,सल्या उर्फ सलीमखान कादीरखान पटवे वय 30 वर्षे,रा.गेंदालाल मिल जळगाव,गोकुळ रामदास पाटील रा.हनुमान मंदीराजवळ हरीविठ्ठल नगर जळगाव,शेख कलीम शेख सलीम रा.दिनदयाळ नगर भुसावळ,किशोर प्रल्हाद बाविस्कर वय या वर्षे,रा.खेडी बुा.ता.जि.जळगाव,10 विकास उर्फ हाडया राजु गुमाने वय 26 वर्षे, रा.तांबापुरा खदान जवळ जळगाव,संजय उर्फ प्रकाश उर्फ डॉन त्रंबक पोपटकर रा.रायसोनीनगर जळगाव,12 पिवन संजय कुमावत वय 20 वर्षे,रा.हरी विठ्ठलनगर जळगाव
पोलिसांनी २०१८ मध्ये तडीपार केलेल्या आरोपीतांचे नाव पत्ता
राजेंद्र उर्फ सोपराज्या दत्तात्रय गुरव वय 29 वर्षे.रा.साई संस्कृती कॉलनी वाघनगर जळगाव,ललीत माधव कुवर वय 30 वर्षे, रा.धफेडरेशन जवळ जळगाव,रविंद्र उफ चिन्या रमेश जगताप वय 23 वर्षे, रा.शिवाजीनगर हडको जळगाव,किरण प्रदीप मोरे वय 24 वर्षे रा.गेदालाल मिल 69/15 जळगाव,मोनल उर्फ मनोज विजय रतवेकर वय 24 वर्षे,रा.गेंदालाल मिल जळगाव,शंकर पुंडलिक ठाकरे वय 35 रा.कोळीपेठ जळगाव, रणजित जिजाबराव इंगळे वय 29 वर्षे रा.जुना आसोदा रोड,गोपाळपुरा जळगाव,सोन्या उर्फ प्रविण ज्ञानेश्वर सोनवणे वय 26 वर्षे, रा.उज्वल चौक कांचननगर जळगाव,विशाल भाउसाहेब मोर वय 22 रा.गेंदालाल मिल जळगाव, भूषण भरत सोनवणे वय 22 रा.सिध्दीविनायक पार्क जुना कानळदा रोड जळगाव, आसीफ शेख शरीफ रा.पिंप्राळा हुडको जळगाव, शेख साहील शेख अब्दुल करीम वय 24 रा.मन्यार वाडा जळगाव, राहल नवल काकडे रा.समतानगर जळगाव
पोलिसांनी २०१९ मध्ये तडीपार केलेल्या आरोपीतांचे नाव पत्ता
योगेश शांतीलाल पाटील रा.लोहार ता.पाचोरा जि.जळगाव,रविंद्र गौतम कासोदे रा.अहिरवाडी ता.रावेर
सुधाकर पंडीत लहासे रा.अहिरवाडी ता.रावेर,पिकज अलीस टेलर रामचंद्र चौधरी रा.फुलगाव ता.भुसावळ, पंकज उर्फ भोला संजय मोरे रा.भडगाव रोड,रिलायन्स पेट्रोलपंपा शेजारी पाचोरा जि.जळगाव,सतिश विलास तायडे रा.जाकिर हुसेन कॉलनी जळगाव,विनोद विलास तायडे रा.जाकीर हुसेन कॉलनी जळगाव,महेंद्र विलास तायडे रा.जळगाव,हरिष बाळु सपकाळे रा.जळगाव,दिपक उर्फ मिरिंडा रामदास चौधरी रा.जळगाव,संतोष मोहन बारसे वय 40 रा.वाल्मीकनगर भुसावळ, किशोर अर्फ हिरामण उर्फ गोजोया सकरू जाधव वय 29 रा.वाल्मीकनगर भुसावळ,देवानंद बाळु सपकाळे वय 28 रा.किल्ला झोपडपट्टी शिवाजीनगर यावल, संतोष रघुनाथ चौधरी वय 28 रा.हतनुर ता.भुसावळ, श्यामल शशिकांत सपकाळे (कोळी) वय 23 रा.कोळीवाडा भुसावळ,निखील सुरेश राजपुत वय 26 रा.श्रीरामनगर भुसावळ,अमोल काशिनाथ राणे वय 23 रा.श्रीरामनगर भुसावळ,अमोल मधुकर चौधरी रा.चौधरी वाडा चाळीसगाव, सागर ज्ञानेश्वर पाटील वय 22 रा.वाडी दरवाजा दिर्णी ता.जामनेर, गणेश सरेश चौधरी रा.चौधरीवाडा चाळीसगाव,दत्तु मुकुंदा चौधरी रा.चौधरी वाडा चाळीसगाव,मनोज उर्फ भैया सुरेश चौधरी रा.चौधरी वाडा चाळीसगाव,राम रामकण दौलत रंधे रा.सावरखेडाब.ता.जि.जळगाव, संदिप देवविदास रंधे वय 23 वर्षे रा.सावरखेडाब.ता.जि.जळगाव,चंदन मोतीगीर गोसावी वय 30 वर्षे, रा.व्यंकटेश नगर जळगाव, रामकृष्ण मोतीराम पाटील वय 37 वर्षे ,रा.सावरखेडा बु.ता.जि.जळगाव, पंडीत उखा राठोड वय 2 वर्ष ,रा.कोळीवाडा पिंप्राळा जळगाव,अनिल आत्माराम चव्हाण वय 25 वर्षे रा.कंभारवाडा पिंप्राळा जळगाव,शरद नामदेव कुंभार वय 29 वर्षे रा.कंभारवाडा पिंप्राळा जळगाव,समाधान साहेबराव चौधरी वय 28 वर्षे ,रा.सावरखेडा बु.ता.जि.जळगाव,आशिष संजय सोनवणे रा.समतानगर जळगाव, शम्मी प्रल्हाद चावरीया वय 29 रा.वाल्मीकनगर भुसावळ, यासीनखान मासुमखान मुलतानी वय 45 रा.गणेशपुरी महेरुण जळगाव,अजय राजेंद्र जगताप वय 28 रा.लाकुडपेठ शिवाजीनगर जळगाव, परशराम विलास पाटील वय 27 वर्षे,रा.लक्ष्मीनगर कानळदा रोड,जळगाव,शेख यनस शेख अयुब उर्फ गबल्या रा.तहानगर फैजपुर यावल, शाम पुनाजी इंगळे रा.शिवकॉलनी फैजपुर ता.यावल, शेख शाहरूख शेख कलीम रा.हाजीरा मोहल्ला फैजपुर ता.यावल, राजू भागवत सुर्यवंशी रा.संभाजीनगर वरणगाव रोड भुसावळ,समाधान अलीस गोया उर्फ अशोक निकम रा.आगवाली चाळ भुसावळ,परमेश्वर देवराम बेलदार रा.कापुसवाडी ता.जामनेर जि.जळगाव,हरदास जगदेव बेलदार रा.कापुसवाडी ता.जामनेर जि.जळगाव,धिनसिंग धिरसिंग राठोड रा.कापुसवाडी ता.जामनेर,देविदास जगदेव बेलदार रा.कापुसवाडी ता.जामनेर,ज्ञानेश्वर ताराम राठोड रा.कापुसवाडी ता.जामनेर,भारत मधुकर महाजन रा.सिध्दीविनायक पार्क शिवपुर कान्हळदा रोड,भुसावळ,संतोष अलीस आकाश वि णु रावलकर रा.हनुमान नगर कु-हा ता.मु.नगर,बापु प्रल्हाद मेढे रा.आंतुली ता.मुक्ताईनगर,मुकेश अलीस मुन्ना साजन खरारे रा.महात्माफुले नगर भुसावळ
ध्वनी प्रदुषण आणि सोशल मिडिया संदर्भात माहिती देण्याचे आवाहन
जळगाव जिल्हयात डी.जे.वाजवून ध्वनी प्रदुषण संदर्भात उल्लंघन होत असल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशनला कळविण्यात बाबत आवाहन करण्यात आले आहे. सोशल मिडीया बाबत कार्यवाही. सध्या सोशल मिडीयावर (Facebook , whatsapp तसेचTwitter) जाती धर्माच्या भावना दुखविल्या जातील असे मजकर प्रसारित होत आहेत. तरी नागरिकांना आव्हान करण्यात येते की, जो कोणीही जातीय तेढ निर्माण होईल, असे आक्षेपार्ह मजकर, फोटो, व्हीडीओ क्लीप, प्रसारित करेल, लाईक करेल, शेअर किंवा कॉमेंट करेल तो भारतीय दंड सहिता कलम व माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 कायदयाप्रमाणे दखलपात्र गुन्हास पात्र राहील. सोशल मिडीयावर असे आक्षेपार्ह मजकुर , व्हिडीओ किंवा फोटो आल्यास तात्काळ डिलीट करावे. अथवा त्याबाबत माहिती पोलीसांना तात्काळ कळवावी. सायबर पोलीस स्टेशन अशा अफवा प्रसार करणा-यावर लक्ष ठेवून आहेत. अशा प्रकारची चुकीची माहिती प्रसार करणा-यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी,असे देखील पोलीस अधीक्षकांनी सांगितलेले आहे.